मुख्यमंत्र्यांचा भूखंडाचा श्रीखंड विधानसभेत बाहेर आणल्यामुळे जयंत पाटील यांच्यावर सुड बुद्धीने निलंबनाची कारवाही – युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख

0
483

पिंपरी,दि.२३(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे निषेध आंदोलन घेण्यात आले.युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन घेण्यात आले.

यावेळी युवकांच्या वतीने “भाजपचे चे मिंधे एकनाथ शिंदे”, “50 खोके माजलेत बोके”, “नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी” या जोरदार घोषणा यावेळी दिल्या गेल्या.

यावेळी बोलताना प्रदेशअध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भूखंडाचा श्रीखंड विरोधकांनी उघडकीस आणल्यामुळे सूडबुद्धीने जयंत पाटील साहेबांवर निलंबनाची कारवाई केली गेली.आदरणीय अजित दादा पवार आणि जयंत पाटील साहेब ही जय-वीरूची जोडी अधिवेशनात सरकाररुपी “गब्बर सिंग” यांना हातबल करत आहेत.सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत आहेत,त्यांना धारेवर धरत आहेत. अजून पुढचे सात दिवस अधिवेशन चालणार असून या पुढच्या सात दिवसात अनेक भ्रष्टाचाराचे प्रश्न जनतेच्या समोर जयंत पाटील साहेब आणतील या भीतीनेच त्यांच्या निलंबनाची कारवाई केली असल्याचा आरोप यावेळेस त्यांनी केला. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील समाचार घेताना मेहबूब शेख म्हणाले “पूर्ण कोराना काळात फेस मास्क वापरला नसेल परंतु आपल्या नाकर्तेपणामुळे कोविड नसताना फेस शील्ड मास्क वापरण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले “हिवाळी अधिवेशनाच्या काळात सभागृहात राज्यातील जनतेच्या विविध महत्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा केली जाते.परंतु शेतकरी, वाढलेली बेरोजगारी, वाढलेली महागाई यावर अपयशी ठरलेलं सत्ताधारी पक्ष आपलं अपयश लपवण्यासाठी विनाकारण सभागृहाचे कामकाज चालू देत नाही. अनावश्यक विषय समोर आणून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे महापाप हे राज्य सरकार करत आहे. कारण नसताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचा निलंबन हा लोकशाहीचा अपमान असून.मुख्यमंत्र्यांचा भूखंड घोटाळा उघडकीस येईल, तसेच भाजप नेत्यांची पार्लमेंट ते पालिका भ्रष्टाचाराची मालिका याची पोलखोल होईल या भीतीने हे निलंबन केले असल्याचा आरोप अजित गव्हाणे यांनी केला.

यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “आदरणीय जयंत पाटील साहेबांचा निलंबन असंवैधानिक असून विरोधी पक्षातील प्रमुख नेते यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रातील राज्य सरकार हिटलरशाहीच्या दिशेने वाटचाल करत असून पिंपरी चिंचवड मधील सरकारचा विरोध करणारे आंदोलनकारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे,सरकार विरोधी बातम्या दाखवल्या म्हणून पत्रकारांवर खोट्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करत आहे.राज्य सरकार विरोधात आंदोलन कस काय झाले म्हणून शहरातील पोलिसांना निलंबित करण्यात आहे.तरुणांची बेरोजगारीचे प्रश्न,वाढती महागाई हा नाकर्तेपणा लपवण्यासाठी राज्य सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबत असल्याचा आरोप देखील इम्रान शेख या वेळेस केला.

युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शहराध्यक्ष अजित गव्हाणे,युवक अध्यक्ष इम्रान शेख,महिला अध्यक्ष कविता आल्हाट,विठ्ठल उर्फ नाना काटे,पंकज भालेकर,शाम लांडे,राहूल भोसले,मयुर कलाटे,प्रसाद शेट्टी, विशाल वाकडकर, वर्षा जगताप, युसुफ कुरेशी, ज्ञानेश्वर कांबळे, दत्तात्रय जगताप, काशीनाथ जगताप, मंगेश बजबळकर, संगीता कोकणे, गोरक्षनाथ पाषाणकर,दीपक गुप्ता,प्रशांत सपकाळ,सचिन आवटे, विजय पिरंगुटे, मिरा कदम,पुनम वाघ, विश्रांती पाडाळे,युवराज पवार, निर्मला माने,प्रदीप गायकवाड,सुदाम शिंदे,अमोल बेंद्रे,माधव पाटील, निलेश निकाळजे,ज्योति गोफने,सुप्रिया सोळंकुरे,मीरा कदम,प्रसाद कोलते, सतिश दरेकर,राहुल पवार, रुबान शेख, प्रवीण खरात,उत्तम कांबळे, मनिषा गटकळ,अभिषेक जगताप,प्रकाश डोळस,सागर वाघमारे,ऋतिक भुजबळ,अफ्रिद शिकलगार,मूवाज मुजावर आणि मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.