मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

0
435

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १६) करण्यात येणार आहे. तसेच, शासन आपल्या दारी या उपक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.

महापालिकेच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. निगडी येथील भक्ती-शक्ती समुह शिल्प उद्यानामागील जागेत महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा गेल्या महिन्यात उभारला आहे.

त्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदीसाठी त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्याच्या योजनेची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्या कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे.