मुख्यमंत्री शिंदे भेटले रश्मी आणि तेजस ठाकरेंना, राजकारणात खळबळ

0
253

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – जेष्ठ नेते शरद पवारा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत रश्मी ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव यांच्याशी त्यांची भेट झाली नसल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी ट्वीट केलं आहे की, “श्रीमती रश्मी ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवाशी माझी भेट झाल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत, या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असून त्यात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही भेट झालेली नाही.”

श्रीकांत शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांना मा. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे भेटल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिध्द केले आहे. हे वृत्त निराधार आणि धादांत खोटे आहे. अशी कोणतीही भेट झालेली नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे वृत्तांकन करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी त्याची सत्यता पडताळायला हवी. उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे माध्यमांकडून अपेक्षित नाही.” असे ट्वीट त्यांनी केलं आहे.

लोकांना खरी माहिती देण्याची जबाबदारी असलेल्या माध्यमांनी खोट्या सूत्राचा आधार घेणे अपेक्षित नाही. त्यातून माध्यमांचीच विश्वासार्हता धोक्यात येते, हे ध्यानात घ्यावे असेही कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदें यांनी म्हटलं आहे.