‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0
87

पुणे, दि.१७ ऑगस्ट (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बालेवाडी स्टेडीयम, पुणे येथे १७ ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज मध्यरात्रीपासून ते उद्या (दि. १७) रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची जड अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.

पुणे-सोलापूर, पुणे-सातारा, पुणे- अहमदनगर, पुणे- नाशिक, पुणे मुंबई (जुना) व पुणे मुंबई द्रुतगती या मार्गावरील सर्व प्रकारची जड अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थी यांची वाहने व शासकीय अधिकारी-कर्मचारी व पदाधिकारी, अत्यावश्यक सेवेतील वाहने आदी वाहनांकरीता निर्बंध शिथील राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे.