मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सा. ५ वाजता फेसबुक माध्यमातून संवाद साधणार

0
215

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ५ वाजता फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीत तब्बल ४० आमदार शिवसेनेतून बाहेर जात असल्याने राज्य सरकार अल्पमतात आले आहे. दुसरीकडे भाजपाने या सर्व आमदारांना बरोबर घेऊन राज्य सरकार तयार कऱण्याची तयारी सुरु केली आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून लाहिले आहे.