मुख्यमंत्रीपदासाठी २०१९ मध्येच नाव होते

0
201

मुंबई, दि.४ (पीसीबी) : मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव होतं हे मला माहित आहे. पण नंतर आम्हाला कळलं की हा निर्णय आमच्याच पक्षाचा होता. मला विरोध नव्हता. महाविकास आघाडी सरकार असल्याने मला मुख्यमंत्रीपद देता येत नाही, असे आमच्या नेतृत्वाने सांगितले होते. त्यानंतर स्वतः ठाकरे मुख्यमंत्री झाले. मी नाराज झालो नाही. कारण पदासाठी मी कधीच काम केले नाही. मला त्या पदाचा मोह कधीही नव्हता. म्हणून मी कधीही त्याविषयी बोललो नाही, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

पण महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आमच्या आमदारांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या भविष्यासाठी निर्णय घ्यावा लागला. सत्तेच्या मोहासाठी लालसेपोटी आम्ही गेलो नाही. आम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी ही भूमिका घेतली नाही. आम्ही गद्दार नाही. बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली नाही. खोटं बोलून आम्ही कोणालाही सोबत घेतलं नाही. असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. आघाडी सरकारमध्ये असताना आमदार येऊन सांगायचे आमची काम होत नाहीत, या आमदारांच्या मतदार संघातील काम झाली नाही तर ते त्यांच्या मतदार संघातील जनतेला उत्तर काय देणार होते. अजित दादा माझ्याही विभागात हस्तक्षेप करायचे पण मी त्यांना काही बोललो नाही, मी कद्रुमनाचा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.