मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्याबाबत

0
44

मुंबई, दि. 25 (पीसीबी) :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. महायुतीने तब्बल 236 जागा काबिज केल्या आहेत. तर, महाविकास आघाडीला 50 च्या पुढचा आकडाही गाठता आलेला नाही. विधानसभेच्या निकालानंतर आता सर्वांचं लक्ष हे शपथविधीकडे लागलं आहे. मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्याबाबत आता चर्चा होत आहेत.

महायुतीची यासंदर्भात बैठक देखील झाली आहे. त्यानंतर महायुतीच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. 21-12-10 अशी मंत्रिमंडळाची विभागणी केली जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीत भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मंत्रीपदे सर्वाधिक भाजपला मिळणार,असंही म्हटलं जातंय. भाजप 21 मंत्रीपदावर दावा करू शकते.

‘असा’ असणार मंत्रीपदाचा फॉर्म्युला?
त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. या सूत्रावर प्राथमिक चर्चा झाली असून तिन्ही पक्षांचे मुख्य नेते दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील.यामध्ये काही बदल देखील होऊ शकतात. सध्या तरी 21-12-10 असा फॉर्म्युला ठरला असल्याचं म्हटलं जातंय.

निवडणुकीत महायुतीला 288 पैकी 236 जागांवर यश मिळालं. यात भाजपला 132, शिवसेनेला 57, तर राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. याशिवाय भाजपच्या मित्रपक्षांना पाच, तर शिंदेंच्या मित्रपक्षांना एका जागेवर यश आलं आहे. तर, महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे.