मुक्या प्राण्यांच्याबाबतीत माणूस निर्दयी बनत चालला आहे ?

0
395

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – मुक्या प्राण्यांच्याबाबतीत माणूस निर्दयी बनत चालला आहे. चिंचवड लिंक रोडची ही घटना आहे. चिंचवडगावातील लिंक रोड माणिक कॉलनी येथील पाळीव व रस्त्यावरील कुत्र्यांना काही समाजकंटकांनी जेवणाद्वारे विष देऊन मारले. गेले दोन-तीन दिवसांंपासून असे प्रकार घडत आहेत. तीन गोंडस पिलांसह त्यांच्या आईला अशाच पध्दतीने विषप्रयोग करुन मारण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात आली.

शुक्रवारी एका व्यायलेल्या कुत्रीला कोणीतरी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला व त्यात तिच्या पिल्लांना दूध पिल्यामुळे आई व तीन पिल्लांचा दुर्देवी मृत्यू झाला परंतु नागरिकांना वाटले गॅस्ट्रोची साथ असल्यामुळे तोंडातून त्यांचा फेस येत मृत्यू झाला परंतु दुसर्‍या दिवशी पुन्हा येथीलच मोती नावाच्या कुत्र्याला कोणीतरी वीष दिले परंतु तो जास्तच त्रास अथवा ओरडू लागल्या मुळे तेथील प्राणी प्रेमी नवीन हेगडे, प्रसाद भूमकर,नकुल भोईर, तुषार आढारी सहकारी मित्रांनी त्याला दवाखान्यात डॉक्टर गोरे यांच्याकडे नेले असता त्यांनी सांगितले की सदर कुत्र्याला कोणीतरी जास्त प्रमाणात वीष दिल गेल्यामुळे त्याचा त्रास त्याला होत आहे जीब पूर्ण काळी निळी झाली होती डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्यास नेहरूनगर येथील हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यास सांगितले होते परंतु आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. तिथेच त्याच्या वरती आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्व प्रकरणातील अज्ञात इसमाने विरुद्ध लवकरच गुन्हा दाखल करून सखोल तपास करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी कठोर कारवाई गरजेची आहे, असे ते म्हणाले.मेडिकल द्वारे अथवा जिथे सदर विष उपलब्ध होते त्यांना डॉक्टरांच्या महत्वाच्या कामा चिठ्ठीशिवाय वीष देऊ नये ,अशी विनंती देखील प्राणिमित्र नकुल भोईर यांनी केलेली आहे