मुक्ताई चॅरिटेबल ट्रस्ट, शितळा देवी भजनी मंडळ ट्रस्ट व साई प्रतिष्ठान यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन

0
430

पिंपरी दि ११ (पीसीबी) – मुक्ताई चॅरिटेबल ट्रस्ट व शितळा देवी भजनी मंडळ ट्रस्ट साई प्रतिष्ठान यांच्या संयोजनातून स्वातंत्र्य दिनानिमित्त येत्या १५ ऑगस्ट रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्य शिबिरात रुग्णांना उपचार दिले जाणार आहेत हे आरोग्य शिबिर गीत गोविंद परिसरात होणार आहे. या शिबिराची दखल गावातील ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट , डॉक्टर ,मेडिकल्स ,तरुण वर्ग व सामाजिक क्षेत्रातील सर्व घटक घेत आहेत.

शिबिराला दिलेल्या पाठिंब्यामुळे बोपखेल येथील तरुणांना देखील जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळते. रुग्णांनी मोठ्या संख्येने या महाआरोग्य शिबिरात सहभागी होऊन सर्व सोयी सुविधांना लाभ घ्यावा, असे आवाहन कमलेश घुले यांनी केले आहे

हे शिबिर रविवार, दिनांक 15ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ०५ पर्यंत, गोविंद नगर बोपखेल, पुणे येथे होणार आहे असे कमलेश घुले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

शिबिरात सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले नाव नोंदवलं जाऊ शकते www.geetgovinddevloparas.com