मुकेश गिरीश प्रभुणे यांचे निधन

0
70

पिंपरी, दि. ७ – मुकेश गिरीश प्रभुणे (वय ४९) यांचे आज शुक्रवारी पहाटे बिजलीनगर, चिंचवड येथे राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ज्येष्ठ समाजसुधारक आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. शांत, अबोल स्वभावाचे मुकेश प्रभुणे हे उत्तम चित्रकार होते. प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांच्या चित्रकारितेचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. मुकेश यांच्यावर काळेवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीसह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली.