मुंबई सायबर क्राईम ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगत तरुणीची 16 लाखांची फसवणूक

0
63

हिंजवडी,दि. ६ (पीसीबी)

मुंबई सायबर क्राईम ब्रँच मधून तसेच फेडेक्स इंटरनॅशनल कुरिअर कंपनी मधून बोलत असल्याचे सांगत तरुणीच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेत 15 लाख 90 हजार रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना 3 जुलै रोजी मेझा 9 हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9232025547 क्रमांकावरून बोलणाऱ्या अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी तरुणीला फोन केला. फोनवरील व्यक्तींनी ते फेडेक्स इंटरनॅशनल कुरिअर कंपनी मुंबई आणि मुंबई सायबर क्राईम ब्रँच मधून बोलत असल्याचे सांगितले. तरुणीकडून कर्जाची प्रक्रिया करून घेत त्यांच्या इंटरनेट बँकिंगचा युजर आयडी घेतला. त्याचा पासवर्ड बदलून तरुणीच्या खात्यावरून 15 लाख 90 हजार रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.