मुंबई शहरात ठाकरे गट 20, काँग्रेस 18 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट 7

0
72

मुंबई, दि. 14 (पीसीबी) : आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर ठेपली आहे. अशातच सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. मात्र या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं दिसत आहेत. अशातच आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
माविआच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही घटक पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा देखील अंतिम टप्प्यात आल्याचं बोललं जात आहे.

सर्वात विशेष म्हणजे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाचा तिढा लवकरच सुटणार आहे. कारण मुंबईतील शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 18 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट 7 जागांवर आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता काँग्रेस पक्ष कोणत्या जागांवर आग्रही आहे याची यादी समोर आली आहे.

Maharashtra l मुंबईतील 18 जागांवर काँग्रेस पक्ष आग्रही :
1) धारावी
2) चांदिवली
3) कुलाबा
4) मालाड पश्चिम
5) वांद्रे पश्चिम
6) मुंबादेवी
7) कांदिवली पूर्व
8) अंधेरी पश्चिम
9) वर्सोवा
10) सायन कोळीवाडा
11) माहीम
12) कुर्ला
13) भायखळा
14) जोगेश्वरी पूर्व
15) चारकोप
16) घाटकोपर पश्चिम
17) बोरीवली
18) मलबार हील


2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत नेमकं काय चित्र होतं? :

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने तब्बल 105 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष असल्याचं सिद्ध केलं होत. मात्र भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. तसेच एकसंघ म्हणून शिवसेना पक्ष 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. तर भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीने देखील आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 54 जागांसह तिसऱ्या, तर काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होता.