मुंबई विद्यापिठाचा हा विशेष सन्मान माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा पुरस्कार – दिग्दर्शक अविनाश कांबीकर

0
41

मुंबई, दि. १६ – मुंबई विद्यापिठाचा विशेष सन्मान माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा पुरस्कार असल्याचे मत चित्रपट दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांनी व्यक्त केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठ आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वतीने बुधवारी 14 ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या ऐतिहासिक सर कावसाजी दिक्षांत सभागृहात आंतरराष्ट्रीय चर्चेसत्राचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ‘अजरामर साहित्याचे निर्माते अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, राष्ट्रीयत्व आणि वैश्विकता’ असा या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा विषय होता.
पुरस्कार सोहळ्यात बोलताना ते म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे, केवळ दिड दिवसाची शाळा शिकून जगातील सर्व विद्यापिठांना दखल घ्यावे लागणारे एकमेव साहित्यिक म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे.
चिरागनगर पासून जवळच असलेल्या या विद्यापिठात हे चर्चासत्र पार पडत असतानाच अण्णा भाऊंच्या सुलतान कथेवरुन प्रेरित #सुलतान या मी दिग्दर्शित केलेल्या लघुपटाचा नुकताच जर्मनीतील 21 Indian film festival मध्ये जागतिक प्रिमियर केल्या बद्दल तसेच सुलतान ला German Star of India चे नामाकंन मिळ्याल्याबद्द्ल मुंबई विद्यापिठाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्रा तर्फे माझा विशेष सन्मान करण्यात आला. भरगच्च भरलेल्या या ऐतिहासिक सभागृहात माझा विशेष सन्मान होत असताना यावेळी माझ्या भावना दाटून आल्या होत्या. मुंबई विद्यापिठाचे कुलगूरु रविंद्र कुलकर्णी सर , प्रमुख पाहूणे डॅा विश्वास पाटील सर , ईलीनोईस विद्यापीठातील आफ्रिकन- अमेरिकन स्टडीचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. फे. हेरिसन, डेप्युटी कौन्सिल जनरल ऑफ फ्रान्स, मुंबईचे सामा बोकाजी, तसेच मार्गारिटा रुडामिनो ऑल रशियन स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मास्को,रशियाचे डायरेक्टर जनरल डॉ. व्हिक्टर कुझमिन आणि राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभिषन चौरे तथा मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड सर विद्यापीठाचे प्राचार्य प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे सर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सुलतान टिमचे माझे सहकारी मित्र तानाजी साठे सोबत होते, तसेच योवळी लोककला विभाग प्रमुख गणेश चंदनशिवे सरांनी शाहीरी कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली..!