मुंबई महापालिकेसाठी मनसेची उमेदवारी देण्याचे आमिष देत महिलेवर बलात्कार

0
275

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : आगामी महापालिका निवडणूकीत उमेदवारी देण्याचे आमिष देत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात पिडीत महिलेने गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभागप्रमुखाला अटक केली आहे. आरोपी हा गिरगावमधील रहिवासी आहे. या प्रकरणी एका ४२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मनसेच्या संबधित पदाधिकाऱ्याने पिडीत महिलेला आगामी निवडणूकीत पक्षाकडून तिकीट मिळवून देतो असे आश्वासन दिले होते.पक्षाकडून उमेदवारी देण्याच्या बहाण्याने आरोपीने वारंवार बलात्कार केल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 या दरम्यानच्या काळात आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. महिला पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

पुढील दोन-तीन महिन्यात मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षात बॅकफुटवर पडलेली मनसेनेही राज्यातील सत्तांतरानंतर नव्या उमेदीने निवडणूकांची तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. दरम्यान, महापालिका निवडणूकांसाठी मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठीच मनसेच्या गोटात हालचालींनाही वेग आला आहे.