दि.०१ (पीसीबी)-मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. दुबार नावांमुळे यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेनं आता वेळी मागितला आहे. तसेच एकाच व्यक्तीचे नाव दोन-तीन नव्हे तर 103 वेळा मतदारयादीत असल्याची माहिती देखील मुंबई महापालिकेडून देण्यात आली आहे.
मुंबईच्या मतदारयादीत दुबारच नव्हे, तर 103 वेळा नाव असलेला मतदार देखील आढळला आहे. मुंबईत तब्बल 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहे. त्यामुळे मनेसप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुबार मतदार असल्याचा केलेला दावा खरा असल्याचं समोर आलं आहे. 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदवली गेल्यानं अशा दुबार मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवर पोहोचली आहे. मात्र बनावट मतदाराचे नाव किती वेळा वारंवार नोंदवले गले आहे, यांची माहिती प्रशासनाकडे नाही. त्यामुळे दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी पालिका प्रशासन विशेष मोहिम हाती घेणार आहे. 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत दुबार मतदार हटवण्यासाठीची मोहिम चालवली जाणार आहे. 24 वॉर्डमधील निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त ही विशेष मोहिम राबवतील
दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय मतदारयादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करून निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकप्रक्रिया राबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र मिळून निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. निवडणूक अयोगाची मतदार याद्यांमध्ये गोंधळ कायम ठेवण्याची, आणि ते कधीही नस्तरता, ते गोंधळ अधिक गुंतागुतीचे कसे होतील या बाबतीतलं जे सातत्य आहे त्याचं अभिनंदन करावं का खेद व्यक्त करावा हेच कळत नाही. असो पण पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित घोळ तसाच ठेवला हे परत सिद्ध झालं असल्याचं म्हटलं होतं.
निवडणूक अयोगाने शेवटची मतदार यादी ही 30 आॅक्टोंबर रोजी प्रकाशित केली. त्यानंतर नवीन यादी प्रकाशीत झाली नाही. निवडणूक आयोगाच्याच नियमाप्रमाणे दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन यादी प्रसिद्ध होते आणि त्यानंतर दर तीन महिन्याला सुधारित यादी प्रसिद्ध होते. या वर्षात असं काही झालंच नाही का? हे हेतुपुरस्सर होत ं असं म्हणले तर निवडणूक आयोगाला लगेच राग येतो. पणजर ते हेतुपुरस्सर नसेल तर मग कारण काय?
संकेतस्थळावर नवीन मतदार नोंदणी,वगळली गेलेली नावं आणि बदल यासह जे प्रसिद्ध केलं आहेत ती फक्त औपचारिकता म्हणून केलं आहेत असं म्हणायला पूर्ण वाव आहे कारण इतका त्याच्यात गोंधळ आहे. कारण नवीन सुधारित यादीत ते कोण आहेत स्त्री का पुरुष? त्यांचा पत्ता काय? याचा कोणताही तपशील नाही. बरं जेव्हा सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ मा. श्री . चोकलिंगम यांना भेटलं होतं तेव्हा त्यांनी कुठल्याही त्रुटींशिवाय आम्ही याद्या प्रसिद्ध करू आणि तुम्ही दिलेल्या सूचनांचं पालन करू असे सांगितलं मग त्याचं काय झालं?
महापालिका निवडणुकांसाठी आधी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2025 ठरली होती आणि ती पुढे ढकलत 20 नोव्हेंबरला निवडणूक अयोगाने प्रसिद्ध केली. मुळात तुम्ही गेले 13 महिने मतदार याद्याच प्रसिद्ध केल्या नाहीत, त्यात जी यादी जी आगामी महापालिका निवडणुकांसाठी सगळ्यात महत्वाची आहे ती प्रसिद्ध करून त्यावर हरकती घ्यायला 8 दिवस दिलेत.. हे काय आहे? मुळात तुम्ही प्रसिद्ध केलेल्या याद्या सदोष. त्यात धड कोणती माहिती नाही. बरं राजकीय कार्यकर्त्यांना त्यावर काम करायचं असेल तर तुम्ही ज्या याद्या प्रसिद्ध केल्यात त्या फक्त वाचण्यास योग्य. मग त्यावर काम करायचं तर त्यावर काही तांत्रिक संस्कार करा त्यालाच काही दिवस लागतात.
मुळात या याद्या एडिटेबल फॉरमॅट मध्ये का नाहीत? जग कृत्रिम बुुद्धमत्तेकडे निघालेलं असताना, निवडणूक अयोगाच्या कारभारात तांत्रिक विषयांतल ‘ जनरल बुद्धीमत्ता ’ पण दिसत नाही असो. बरं या याद्यांवर अभ्यास करून आक्षेप नोंदवायचे तर त्याची प्रक्रिया पण तुम्ही किचकट करून ठेवली आहेत. अनेक ठिकाणी एका वॉर्डमधले मतदार दुसर्या वॉर्डमध्ये टाकलेत. अनेक इमारती तुम्ही आखून दिलेल्या नकाशाच्या आता मतदार पण पळवायला सुरुवात झाली आहे का? पलिकडे आहेत, तरीही त्या वॉर्डमध्ये दिसत आहेत. सध्या सत्ताधारी पक्ष उमेदवार पळत आहेत, त्यातून प्रेरणा घेऊन
याद्यांवर काम करून आक्षेप नोंदवताना, आक्षेप घेणार्यानेच त्या मतदाराचं आधारकार्ड किंवा इतर पुरावा मागितला आहे. हे म्हणजे चुका तुम्ही करायच्या आणि त्या आम्ही दाखवल्या की तुम्ही आमच्याकडे किंवा मतदाराकडे पुरावे मागायचे. वा ! बरं ज्या दुबार मतदारांच्या विषयासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिाकर्यांना भेटत होतो, आणि दुबार नाहीतच असा निवडणूक अयोग तेव्हा बनाव करत होता. त्याच निवडणूक आयोगाने मान्य केलं की जवळपास 10 लाख दुबार मतदार आहेत. मग जर इतके मतदार दुबार आहेत त्यांना शोधून, त्यांची नावं वगळण्यासाठी 7 ते 8 दिवस कसे पुरतील? त्यासाठी किमान 21 दिवस हवेत. आक्षेप घेण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यास एकत्रित आक्षेप घेण्याची मुभा असली पाहिजे.
एकतर निवडणूक आयोगाने 21 दिवस द्यावेत किंवा निवडणूक रद्द करावी. आणि पुन्हा सर्व याद्या सुरळीत करून निवडणुका घ्याव्यात. तुम्ही 5 डिसेंबर 2025 ला एक यादी प्रसिद्ध कराल आणि नियमाप्रमाणे आम्ही सगळं केले असं सांगून स्वत:च समाधान कराल. पण महाराष्ट्रातील जनतेला हे माहित आहे की तुम्ही अजिबात तुमच्या कामाबाबत प्रामाणिक नाही आहात. तुम्ही स्वत:ला स्वायत्त यंत्रणा म्हणवता, मग तुमची स्वायत्ता दाखवाच. एक गोष्ट विसरू नका, तुम्ही पण या राज्याचे नागरिक आहात.. आज कोणाच्यातरी मागे घरंगळत जाताना तुम्हाला छान वाटेल..पण ज्यांच्यामागे तुम्ही घरंगळत जात आहेत. ती लोकं उद्या तुमच्या नरडीला नख लावतील तेंव्हा तुम्हाला कळेल. तुमच्यात सद्सदविवेक बद्धी आहे असं आम्ही मानतो, तिचा मान राखा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेऊन तुमची स्वायत्तेतून येणारी शक्ती काय असते ही सत्ताधार्यांना दाखवा. महाराष्ट्राची जनता तुमची शतश:ऋणी राहील.










































