मुंबई महापालिकेची प्रभाग रचना रद्द कऱण्याची मागणी..

0
301

मुंबई, दि. २ (पीसीबी) : काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहेत. राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य, संस्थेच्या निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते फडणवीसांना भेटले आहेत. तर मुंबई महापालिकेची प्रभाग रचना बदलण्यात यावी अशी मागणी त्यांनी फडणवीसांकडे केली आहे.

मुंबईतील महापालिकेच्या निवडणुका निष्पक्षपणे पार पडायला हव्यात. फक्त एका पक्षाच्या फायद्यासाठी प्रभाग रचनेत बदल करणे योग्य नसून ते घटनेच्या विरोधात आहे. मुंबईत जाहीर झालेल्या प्रभाग रचना रद्द कराव्यात यासंदर्भात आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी आमच्यासोबत महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा हेही उपस्थित होते अशी माहिती मिलिंद देवरा यांनी दिली.

दरम्यान, कोर्टाने निर्णय दिल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या प्रभाग रचना सुद्धा जाहीर करण्यात आल्या होत्या. या प्रभाग रचनेत अन्याय झाला असून नवी प्रभाग रचना रद्द करण्यात यावी अशी मागणी देवरा यांनी केली आहे. या प्रभाग रचनेत कुणाचा फायदा आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे यासंदर्भात जास्त बोलण्याची गरज नाही असंही देवरा म्हणाले आहेत.