मुंबई महापालिकेचा सात बारा शिवसेनेच्या नावावर – संजय राऊत

0
270

मुंबई, दि. १ जुलै (पीसीबी) – मुंबईतील भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गटानं मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांनी या मोर्चात उपस्थित जनतेला संबोधित केलं. मुंबई महापालिकेचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना-भाजपला आव्हान दिलं आहे.

राऊत म्हणाले, “महाराष्ट्र नव्हे तर या देशाचं तरुण नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा अती विराट मोर्चा धडकला आहे. सूर्य उगवला आहे, सगळ्यांना वाटत होतं पाऊस पडेल, मोर्चा काय होईल. पण पाऊस पडला तो शिवसैनिकांचा आपल्याला आशीर्वाद द्यायला देवताही आले आहेत. त्यामुळं आम्हाला केवळ जनतेचेच नव्हे तर ३३ कोटी देवदेवतांचे आशीर्वाद आहेत. बरंजगबली कर्नाटकात मोदींना पावला नाही, पण याच बजरंगानं आदित्य़ ठाकरेंना गदा दिली आहे, आता हीच गदा महापालिकेत फिरवायची आहे. मग हे चोर आणि चोरावरचे मोर कसे बिळात जाऊन बसतात पाहा”

भाजपाची खास करुन मोदी-शहा, फडणवीस आणि मिंधे यांची एकच इच्छा आहे की भ्रष्टाचार करायचा असेल तर आमच्या पक्षात या. पण आज लाखो लोक याविरोधात एकत्र जमले आहेत. मुंबईकर म्हणताहेत आत्ता निवडणुका घ्या चोर कोण आणि शोर कुणाचा हे कळेल. माझं आव्हान आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून मोर्चा पहावा तुमची बुब्बुळ बाहेर येतील, असंही राऊत यावेळी म्हणाले.