मुंबई दि . १२ ( पीसीबी ) : मुंबई महापालिका निवडणुकीची चाहूल लागली असून, सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी देखील कंबर कसली असून, पुन्हा एकदा महापालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेवर २५ वर्षे अधिराज्य गाजवल्यानंतर आता पुन्हा एकदा महापालिका मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत.
राज्य सरकारने महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे आदेश जारी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या खास 12 शिलेदारांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
या महापालिका निवडणुकीत 2017 च्या रचनेप्रमाणे प्रभाग असणार आहेत. मुंबई वगळता इतर महापालिका या चार सदस्यीय प्रभाग असणार आहेत. तर मुंबई महापालिकेत एकच प्रभाग असणार आहे.
‘या’ 12 उपनेत्यांवर ठाकरेंनी सोपवली विशेष जबाबदारी
अमोल कीर्तीकर – दहिसर, बोरिवली, मागाठाणे
विश्वासराव नेरूरकर – वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम
उद्धव कदम – चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम
विलास पोतनीस – दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व
रवींद्र मिर्लेकर – विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम
गुरुनाथ खोत -, चांदिवली, कलीना, कुर्ला
सुबोध आचार्य – घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर – मानखुर्द
मनोज जमसूतकर – अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
अरुण दूधवडकर – धारावी, माहीम, वडाळा
सचिन अहिर – मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी
अशोक धात्रक – वरळी, दादर, शिवडी
नितीन नांदगावकर * विक्रोळी, भांडुप, मुलुंड
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर ठाकरे गटासाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. या निवडणुकीत आपलं अस्तित्व जपण्यासाठी ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरेल. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ठाकरेंचे अस्तित्व संपण्याचा प्रयत्न असेल.
अस्तित्वाच्या या लढाईत उद्धव ठाकरेंचे 12 शिलेदार विधानसभा मतदार संघानुसार काम पाहतील. या 12 उपनेत्यांवर प्रत्येकी 3 विधानसभा मतदारसंघातील महापालिका वॉर्डची जबाबदारी असणार आहे.