मुंबई जिंकण्यासाठी शिंदे-फडणवीसांची मोठी खेळी

0
188

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप युती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला मोठ्या आशा आहेत. मात्र मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मुंबईसाठी मोठा निधी दिला आहे. कायम शिवसेनेच्या ताब्यात असणारी मुंबई जिंकण्यासाठीच बजेटमध्ये निधीची खैरात केल्याची टीका आता सर्व विरोधक करत आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात शहरी भागातील नागरिकांना दिलासा देतानाच सरकारने कृषी क्षेत्रावर भर दिला आहे. मात्र मुंबईसाठी घोषित केलेल्या निधीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. फडणवीसांनी मुंबईसाठी एकून २ हजार ३१५.२ कोटी रूपयांचा निधी दिला आहे.
– मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : १७२९ कोटी रुपये
– एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण
– ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: ४२४ कोटी रुपये
– गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लब नजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : १६२.२० कोटी