मुंबईत हलक्या वाहनांना टोलमाफी, पुणेकरांनी काय घोड मारलंय…

0
61

पुणे, दि. १४ (पीसीबी) : मुंबई प्रवेश नाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुणेकरांनीच काय घोडं मारलंय म्हणून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे बाबत हा निर्णय होत नाही, असा रोकडा सवाल
सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.

आपल्या निवेदनात ते म्हणतात,  तसंही महाराष्ट्र सरकार जनतेच्या करांच्या पैशातून कंत्राटदाराचं या मुंबई प्रवेश नाका टोलमाफीमुळे होणारं नुकसान भरुन देणार आहे याचा साधा अर्थ जनतेचे पैसे असे नाही तर तसे जाणारच आणि कंत्राटदाराचं उखळ पांढरे होत राहणार.  या टोल रोडचा capital outlay जाहीर करा अशी मागणी आम्ही अनेक वर्षे करतोय पण त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो आहे, कारण capital outlay वसूल झाल्याचे दिसून आले की नियमानुसार टोल वसुली बंदच करावी लागते