मुंबईत घबाड सापडलं, २३ किलो सोनं जप्त

0
64

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : महलूस गुप्तवार्ता विभागाने केलेल्या कारवाईत मोठे घबाड मिळाले. या कारवाईत 17 कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे. मोठ्या शिताफीने ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोन्याची तस्करी उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणात आतापर्यंत दोन महिला आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

तस्करीतील 17 कोटींचे सोने बाळगणाऱ्या तिघांना या कारवाईत अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. मुंबई सेंट्रल येथे महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईत तस्करीतील सोने लपवण्यासाठी जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून 23 किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे. बाजारातील किंमत सुमारे 17 कोटींच्या घरात आहे. गिरगाव फणसवाडी येथून मुंबई सेंट्रल येथे सोने घेऊन जात असताना आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी आणखी एका आरोपीचा सहभाग उघड झाला आहे.

आरोपी सोने लपवण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी सर्व योजना आखली होती. त्याअगोदरच त्यांच्यावर कारवाई झाली. पायल जैन(39), पंखुदेवी माली(38), राजेश कुमार जैन(43) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यातील पंखुदेवी भुलेश्वर येथील रहिवासी आहे,. तर पायल व राजेश दोघेही मुंबई सेंट्रल येथील रहिवासी आहेत. राजेश आणि त्याचा साथीदार रमेश यांच्या माहितीनुसार, हे तिघेही फणसवाडी येथून सोने घेऊन मुंबई सेट्रल येथील घरी ठेवण्यासाठी घेऊन जात होते.

त्याबाबतची माहिती डीआरआयला मिळाली. त्यानुसार डीआरआयने सापळा रचला. तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेच्या झडतीत 22.89 किलोग्रॅम तस्करी केलेले सोने सापडले. याशिवाय तस्करी केलेल्या सोन्याच्या विक्रीच्या उत्पन्नाचे 40 लाख रुपये घरात लपवले होते. ती रक्कमही हस्तगत करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 16 कोटी 91 लाख रुपये आहे. आरोपींविरोधात सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. तिघांना पण अटक करण्यात आली आहे.