दि . २८ (पीसीबी ) – मुंबईतील ईडी ऑफिसच्या बिल्डिंगला रविवारी (दि.28) भीषण आग लागली होती. मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) झोनल ऑफिस क्रमांक-1 मध्ये ही आग लागली होती. यामुळे अनेक कागदपत्रे जळाल्याची माहिती समोर आली होती. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, इडी कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. ईडीकडे असलेला प्रत्येक कागद सेफ आहे. त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे. त्याच स्टोरेज देखील आहे. त्यामुळे या आगीमुळे कोणत्याही केसला केसाचाही धक्का लागलेला नाही.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आग लागणे हे गंभीर बाब आहे. जिथं पार्किंगची अडचण नाही, तिथ गर्दी नाही तिथ आगीचा बंब उशिरा पोहोचला कसा? या ठिकाणी 15 मिनिटांत आग विझवणे अपेक्षित होते. मात्र असं झालं नाही. महत्त्वाचे कागद जळले मग यांच्याकडे या फाईलचा बॅकअप आहे का? महापालिकेला इथल्या सेफ्टी ऑडिट बाबत सांगव लागेल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, बुलेट ट्रेन बाबत मला प्रश्न विचारण्यात आला आणि त्या बाबत आपण काम करत आहोत. काम सुरू आहे आणि आम्ही ते पूर्ण करू..2028 पर्यंत पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की या आगोदर उद्धव ठाकरेंच्या सरकारने बुलेट ट्रेनचं काम बंद केलं होतं. मात्र या सगळ्या कामासाठीच कर्ज हे किती होत आणि त्याची जबाबदारी कोण घेणार होतं? पण आता हे काम आम्ही करत आहोत. आपल्या पेक्षा गुजरात पुढे आहे कारण त्याचं काम सुरू आहे. लवकरचं आपण पण सगळं काम पूर्ण करु..
जे कोणीही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आले होते त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. केंद्र सरकारने सांगितल्या प्रमाणे आम्ही करत आहोत आणि तेच होणार आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.