मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी कडून अटक

0
239

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली.

संजय पांडे यांनी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात आज तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान एनएसई घोटाळ्याप्रकरणी संजय पांडे यांच्या कंपनीचा समावेश असल्याचे आरोप त्यांच्यावर होते. तसेच त्यांच्यावर फोन टॅपींग केल्याचे देखील आरोप आहेत. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय कडून चौकशी करण्यात येत होती. दरम्यान ईडीने आज त्यांना अटक केली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्यावर NSE कर्मचाऱ्यांचे कॉल बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. पांडे हे ३० जून रोजी निवृत्त झाले आहेत. 2009 ते 2017 दरम्यान NSE कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा त्याच्यावर आरोप असून त्यासाठी आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने त्यांना ४.४५ कोटी रुपये दिल्याचे समोर आले आहे.