मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स

0
306

पुणे, दि.४ (पीसीबी): मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. आणि ईडीने मंगळवारी (ता.५ जुलै) चौकशीसाठी बोलाविले आहे. दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे गुरुवारी (ता.३० जून) सेवा निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत ईडीने त्यांना नोटीस पाठवली आहे.

संजय पांडे ज्यावेळी पोलीस महासंचालक होते, तेव्हा पांडे यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तसेच सर्व्हर तडजोड प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या दोन्ही प्रकरणी संजय पांडे यांना ईडीने नोटीस बजावण्यात आली आहे.