मी पुन्हा आलो… देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब

0
38

मुंबई, दि. 04 (पीसीबी) : मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. कोअर कमिटीच्या बैठकिनंतर पक्षाच्या बैठकित फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकित चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला. सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार, मधुकर चव्हाणे, गोपीचंद पडळकर आदींनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. निरीक्षक विजय रुपानी यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आता भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची बैठकीत १३२ पक्षाचे आणि पाच अपक्षांचे मिळून १३७ आमदार उपस्थित होते. या बैठकीत रणधीर सावरकर यांनी गटनेता निवड बैठकीत संचलन केले.

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी अभिनंदनपर भाषणात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला पुन्हा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली.देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे स्थान किती महत्वाचे आहे ते स्पष्ट केले. आम्ही एक आहोत तर सुरक्षित आहोत, असे त्या म्हणाल्या.