मी पंतप्रधानांना नाही, ते मला शत्रू मानतात – उध्दव ठाकरे

0
271

राजापूर, दि. ५ (पीसीबी) : रायगड मधल्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला मराठीतील कुराण दिले, त्यांना आपले हिंदुत्व कळलं आहे. राजनला धन्यवाद आणि त्याची पाठ थोपटायला आलोय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘देशभरात यांच्या कारभाराचे चटके बसतायत. आमचं हिंदुत्व धर्माधर्मात आग लावणारं नाही. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत कशी लावता असा सवालही उद्धव ठाकरे यांनी एसीबी अधिकाऱ्यांना विचारला आहे. कारण त्यांचे दिवस फिरले तसे तुमचेही फिरतील’, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राजापूर येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना म्हटलं की, ‘राजन साळवी यांच्यावर आरोप केले. राजन साळवी यांची मालमत्ता सापडली असेल तर, राजापुरामध्ये जे नवीन इच्छुक उमेदवार खर्च करत आहेत, त्यांच्या घरी आधी धाड टाका. त्यांनी पैसे कुठून आणले, ज्यांच्या घरी धाड टाका. त्यांच्या संपत्तीची चौकशी करा, जाहिराती करतायत, त्यांची चौकशी करा. ‘ राजन साळवींच्या घरी काही मिळालं नाही म्हणून वस्तूंची किंमत काढली. एसीबी अधिकाऱ्यांनी शिवरायांच्या मूर्तीची किंमत लावली. मिंधेच्या पक्षात जात नाही म्हणून राजन साळवींवर कारवाई करण्यात येतेय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मी पंतप्रधानांना नाही, ते मला शत्रू मानतात. कारण त्यांनी आपली शिवसेना फोडली, शिवसेना चोरली. ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकट काळात मदत केली होती, त्या बाळासाहेबांची त्यांनी चोरी केली. चोराला मदत केली, चोराला मुख्यमंत्री म्हणून बसवला. तिकडे नितीश कुमारांना तोडलं, सोरेन यांना तुरुंगात टाकलं. केजरीवालांच्या मागे लागलेत. राजन साळवी, वायकर, सूरज चव्हाण यांच्याही मागे लागले आहेत.