मिशन ४५ का मिशन ४८ का नाही – अजित पवार

0
231

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. आज, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच भाजपकडून आपल्याविरोधात करण्यात येत असलेले आंदोलन पूर्व नियोजीत होते, असा आरोपही केला.

यावेळी अजित पवार यांनी चौफेर टीका केला. मी कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधीपक्ष नेते पद राष्ट्रवादीने दिलेलं आहे. भाजपने सगळ्या नेत्यांना आदेश दिले की, अजित पवार यांच्या विरोधात निदर्शनं करा आणि त्यांचा राजीनामा मागा. मात्र मला विरोधी पक्ष नेता म्हणून राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांनी केलं आहे.

अजित पवारांनी भाजपच्या २०२४ मधील मिशन ४५ बाबत प्रश्न विचारला. त्यावेळी संतप्त झालेल्या अजित पवारांनी मिशन ४५ का मिशन ४८ का नाही, असा संतप्त सवाल केला. तसेच मिशन ४८ करा आणि मिशन २८८ पण करा, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

भाजप राज्यपालांविरोधात भाजप गप्प का? असा प्रश्न उपस्थित करत मी असा कोणता गुन्हा केला, असही अजित पवारांनी विचारलं.