मिरवणुकीत घरासमोर डीजे वाजवण्यास मनाई केली म्हणून कुटुंबावर जीवघेणा हल्ला

0
1074

सोमाटणे फाटा, दि. २७ (पीसीबी) – घरातील मुलाची मयत झाल्याने घरासमोर डीजे वाजवण्यास मनाई केली म्हणून मिरवणुकीतील तब्बल 21 जणांनी कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना सोमवारी सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती परिसरात रात्री उशिरा घडली.

याप्रकरणी सुनील प्रभाकर शिंदे (वय 38 रा . सोमाटणे फाटा तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी सुनील बंदा रजपूत (वय 28) मुकेश करसन रजपूत (वय 26) रवी करसन रजपूत (वय 30) सनी करसन रजपूत (वय 32) प्रवीण करसन रजपूत (वय 30) अक्षय ज्ञानेश्वर काकडे (वय 28) अतुल वेलसी रजपूत (वय 21) कृष्णा बलभीम खराते (वय 23) रवी हिरा रजपूत (वय 28) संदीप रमेश रजपूत (वय 29) विशाल काळुराम रजपूत (वय 29) संतोष काळूराम राजपूत (वय 25 ) विलास हिरा रजपूत (वय 22) अनिल हिम्मत रजपूत (वय 31) करसन जयंती रजपूत (वय 50) दीपक हिम्मत रजपूत (वय 32 ) आकाश अशोक रजपूत (वय 21) काळुराम भिकारजपूत (वय 55) वसंत भिका रजपूत (वय 51) अमित वेलसी राजपूत (वय 24) रमेश जयंती रजपूत (वय 50) सर्व राहणार शिंदे वस्ती सोमाटणे फाटा यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाचे काही दिवसापूर्वीच निधन झाले आहे.यावेळी घरासमोरून मिरवणुकीत डीजे सुरू असताना फिर्यादी यांनी त्यांना परिस्थितीची कल्पना देत डीजे बंद करण्यास सांगितला .यावेळी गणपती विसर्जन करून परतत असताना आरोपींनी आम्हाला ढोल ताशे डीजे वाजवू का दिला नाही या रागातून फिर्यादी,फिर्यादी यांचा मित्र किरण येवले,भाऊ गणेश शिंदे, आई, वडील सदाशिव शिंदे व ड्रायव्हर जन्मराज कांबळे यांना काट्याने कोयत्याने व लोखंडी सळई ने मारहाण केली. यात सारे गंभीर जखमी झाले. या जीवघेण्या हल्ल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती.यावरून पोलिसांनी आरोपींवर खूनाचा प्रयत्न तसेच बेकायदा शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.