पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – देहू येथील संत तुकाराम महाराज शीळा मंदिराचे अनावर कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करून दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पवार यांना भाषणाबाबत निर्देश केले, पण निवेदकाच्या वेळापत्रकात दादांचे नाव नसल्याने त्यांचीही कोंडी झाली होती. पवार यांनी नम्रपणे नकार देत मोदी यांना भाषणासाठी विनंती केली. प्रोटोकॉलनुसार पवार यांना बोलून देणे क्रमप्राप्त होते, पण मोदी यांच्या मिनीट टू मिनीट प्रोग्राम मध्ये तसा कुठेही उल्लेख नव्हता, असे उघडकिस आले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे महाराष्ट्राचा घोर अपमान झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून हा तर भाजपाचा मेळावा झाल्याची टीका सुरू झाली आहे.
मोदी यांचे सर्व वेळापत्रक तयार करणाऱ्यांनी दु. १.४५ पासून ते दु. ३ पर्यंतचे मिनीट टू मिनीट वेळापत्रक तयार केलेले पीसीबी च्या हातात पडले. त्यात मोदी यांचे आगमन, पूजा, राम मंदिरात दर्शन, इंद्रायणी नदीचे दर्शन, भांडारा डोंगर माहिती असा १.५७ पर्यंतचा कार्यक्रम आहे. नंतर शीळा मंदिराचे अनावरण, हस्तलिखीत गाथा दर्शन करुन दु. २.०५ पर्यंत सभास्थळी आगमन आहे. नंतरच्या तासाभराच्या कार्यक्रमात १० मिनीटांत स्वागत, संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे यांचे भाषण ५ मिनीट संपल्यावर थेट देवेंद्र फडणवीस यांचे ५ मिनीटांचे भाषण, संत चोखामेळा यांच्या गाथेचे प्रकाषन आणि दु. २.२३ ते दु. ३ वाजेपर्यंत मोदी यांचे भाषण. अशा पध्दतीने अजित पवार यांच्या भाषणाचा कुठेही उल्लेख नाही.