मित्रासोबत सेक्ससाठी पत्नीवर दबाव….

0
32

पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली असून पतीने कार्यालयात काम करणाऱ्या मित्राला घरी राहण्यासाठी बोलावून पत्नीला त्याच्यासोबत शरीरसंबंध करण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

पतीच्या आणि त्याच्या मित्राच्या वर्तनामुळे घाबरलेल्या महिलेने थेट माहेर गाठले. त्यानंतरदेखील पतीच्या या मित्राने तिला सातत्याने मेसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला मेसेज आणि फोनवर ‘‘तुझा पती तुझ्यासोबत सेक्स करु शकत नाही. तो मला तुझ्यासोबत सेक्स करुन मुलबाळ जन्माला घालून दे, असे सांगत आहे,’’ असे अश्लील संभाषण केले आणि पतीच्या लैंगिक क्षमतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करीत तिचा विनयभंग केला. विवाहितेच्या या तक्रारीनंतर खडक पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी २५ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा ३० वर्षीय पती आणि ५० वर्षीय मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ जुलै २०२३ ते २ मार्च २०२५ या कालावधीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सध्या तिच्या आई-वडील, भाऊ आणि वहिनीसह राहण्यास आहे. तिचे सांगली जिल्ह्यातील मिरजमधील एक तरूणाशी २०२३ मध्ये लग्न झाले होते. हा लग्न सोहळा पुण्यात पार पडला होता. लग्न झाल्यानंतर विवाहिता सासरी नांदण्यास गेली. तिचा पतीसोबत विसंवाद घडू लागला. पती तिच्याशी सतत वादविवाद करत होता. तसेच काही काळानंतर त्याने मारहाणदेखील करण्यास सुरुवात केली.

लग्नानंतर काही काळ जोडपे सातारा रस्ता परिसरातील एका सोसायटीत राहात होते. या विवाहितेच्या पतीने २१ जुलै २०२३ रोजी त्याच्या एका मित्राला घरी आणले. त्यावेळी पतीने मित्राची बायको घरी नसल्यामुळे तो आपल्याकडे राहणार असल्याचे सांगत त्याच्यासाठी जेवण बनवण्यास सांगितले. विवाहितेने त्याच्यासाठी जेवण बनवले. त्या रात्री तो मित्र त्यांच्या घरी राहिला. त्या दिवशी विवाहिता आणि तिचा पती बेडरूममध्ये होते. त्यावेळी तो मित्रदेखील तेथेच होता. तो एकटक तिच्याकडे पहात होता. तसेच तिच्या बेडरुममध्ये अपुऱ्या कपड्यांमध्ये तिच्यासमोर आला होता. घाबरलेल्या विवाहितेने ती संपूर्ण रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी पतीने तो मित्र आणखी एक दिवस राहणार असल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादीने पतीला त्या व्यक्तीची नजर चांगली नसल्याचे सांगितले. मात्र, पतीने ‘‘तो तसा नाही. तो माझ्या ऑफिसचा मित्र आहे,’’ असे सांगत वेळ मारून नेली. विवाहिता घाबरलेली असल्याने ती पतीला सांगून घरी माहेरी निघून आली.

पतीचा मित्र निघून गेल्यानंतर विवाहिता पुन्हा घरी गेली. आरोपी पती वाद घालून तिला मारहाण करीत होता. त्यामुळे पिडीत महिलेने त्याच्यापासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला.