मित्राला भेटण्‍यासाठी गेलेल्‍या तरुणास सलूनमध्ये मारहाण

0
2

दि.१३(पीसीबी)-सलूनमध्ये मित्राला भेटण्‍यासाठी गेलेल्‍या तरुणाशी झालेल्या वादातून त्‍यास कात्रीने मारहाण करून जखमी केले. ही घटना तळवडे येथे बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास घडली.

लालबाबू ऊर्फ बबलू चौहान (४५, तळवडे) आणि अजिज शेरअमली (२५, एल. जी. कंपनीसमोर, तळवडे) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे असून पोलिसांनी लालबाबू याला अटक केली आहे. कन्हैयाकुमार दिनेश शर्मा (२२, संत तुकाराम नगर, तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास फिर्यादी हे आपल्‍या मित्राला भेटण्‍यासाठी सलूनमध्‍ये गेले होते. त्‍यावेळी झालेल्‍या शिवीगाळीच्या वादातून आरोपीने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच केस कापण्याच्या कात्रीने वार करून जखमी केले. देहुरोड पोलीस तपास करीत आहेत.