मित्राची दुचाकी जाळणाऱ्या मित्रावर गुन्हा दाखल

0
451

मोई, दि. २१ (पीसीबी) – मित्राच्या दुचाकीला आग लाऊन दुचाकी जाळली. याप्रकरणी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 17) पहाटे सहा वाजता फलकेवस्ती, मोई येथे घडली.

विकास भीमराव भिसे (वय 35, रा. आंबी, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या मित्राचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने त्यांची दुचाकी (एमएच 14/एलएच 3743) राहत्या खोलीसमोर पार्क केली होती. रविवारी पहाटे फिर्यादी यांचा मित्र विकास भिसे याने फिर्यादीच्या दुचाकीला आग लावली. यामध्ये दुचाकी जळून 80 हजारांचे नुकसान झाले. तसेच या घटनेत इमारतीमधील लाईट बोर्ड आणि वायरिंग देखील जळाली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.