मित्रांनी मोबाईल चोरीचा आळ घेत केली तरुणाला मारहाण

0
110

महाळुंगे, दि. 2 ऑगस्ट (पीसीबी) – मोबाईल चोरीचा आळ घेऊन तरुणाला त्याच्याच 2 मित्रांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी (दि.31) निघोजे येथे घडली.याप्रकरणी महाळूंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बापनं बिसवा जीतदे (वय 21 रा.निघोजे) यांनी फिर्याद दिली आहे.जोयनंदू मलाकार वय 25, माधव किशोर पोंगलो वय 26 या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांचे मित्र आहेत. त्यांनी फिर्यादी वर मोबाईल चोरीचा आळ घेत बेदम मारहाण करत फिर्यादीला जखमी केले आहे. यावरून महळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.