मिक्स ड्रायफ्रुट्स खरेदीच्या बहाण्याने 50 हजारांची फसवणूक

0
430

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – मिक्स ड्रायफ्रुट्स खरेदी करण्याच्या बहाण्याने फेक लिंक पाठवून महिलेची 50 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 25 ऑगस्ट रोजी चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7722821323, 4461107201 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना मिक्स ड्रायफ्रुट्सची ऑर्डर देण्याचे आमिष दाखवले. त्याचे पेमेंट करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना फेक लिंक पाठवली. त्यावरून आरोपींनी फिर्यादीकडून 50 हजार रुपये घेत फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.