मिक्सर ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

0
9

हिंजवडी, दि.11 (पीसीबी)
वाकड-हिंजवडी मार्गावर मिक्सर ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली.

पांडुरंग लक्ष्मण विटकर (वय २१), सम्राट विनोद महाले (वय १९, रा. माण, ता. मुळशी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अजिंक्य शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजबहादूर जगन्नाथ साकेत (वय २४, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजबहादूर हा त्याच्या ताब्यातील मिक्सर ट्रक वाकड-हिंजवडी मार्गावरून घेऊन जात होता. पीएसपी बँकेट समोर आल्यानंतर मिक्सरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पांडुरंग विटकर आणि सम्राट महाले यांचा मिक्सरच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.