मिक्सरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0
51

हिंजवडी, दि. २० : दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मिक्सर वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. नागेश जय प्रकाश बिराजदार (वय २१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी सोमेश्वर भरत लांडे ( २५, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र नागेश बिराजदार हे मारुंजी रोडवरून लक्ष्मी चौकाकडे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यांच्या वाहनामागून येणाऱ्या (एमएच १४ एलबी ०९३६) सिमेंट मिक्सरवरील चालकाने भरधाव वेगाने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये फिर्यादी जखमी झाले. तर त्यांचा मित्र नागेश बिराजदार यांचा मृत्यू झाला.