मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपचा जोरदार दावा, कर्जत मेळाव्यात आग्रही मागणी

0
292

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – भाजपने मावळ लोकसभा मतदारसंघावर जोरदार दावा केला आहे. लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कर्जत येथील मेळाव्यात ही मागणी उचलून धरण्यात आली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे निरीक्षक प्रमोद जी.सावंत यांच्या उपस्थितीत सर्व कार्यकर्त्यांनी हा विषय लावून धरल्याने आताचे खासदार श्रीरंग बारणे यांची वाट बिकट झाली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद जी सावंत साहेब यांनी मावळ लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभेच्या भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा कर्जत या ठिकाणी पार पडली. या बैठकीसाठी भाजप जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरातील 200 कार्यकर्त्यांची टीम उपस्थित होती. या वेळी जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राम मंदिराची प्रतिकृती देऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सन्मान केला. पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांच्यासह आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप, सदाशिव खाडे, नामदेव ढाके, पक्षाचे प्रवक्ते राजू दुर्गे आणि सर्वतालुक्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद जी सावंत साहेब यांनी मावळ लोकसभा क्षेत्रातील 6 विधानसभेच्या भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा कर्जत या ठिकाणी पार पडली. या बैठकीसाठी भाजप जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरातील 200 कार्यकर्त्यांची टीम उपस्थित होती. या वेळी जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राम मंदिराची प्रतिकृती देऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सन्मान केला.

भाजपसाठी मावळ लोकसभा का पाहिजे यावर सर्वांनीच आग्रही भूमिका घेतली. गेल्या तीन निवडणुकांतून शिवसेनेचे गजानन बाबर नंतर श्रीरंग बारणे यांचे काम भाजपने केले. प्रत्यक्षात भाजपची ताकद ८० टक्के आहे. सहा पैकी ४ आमदार भाजपचे, पनवेल आणि पिंपरी चिंचवड महापालिका भाजपच्या तसेच अनेक आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, सरपंच ही सगळी आकडेवारीही पुरावा म्हणून सादर करण्यात आली. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी किंवा शिवसेना शिंदे गट नव्हे तर भाजपला उमेदवारी दिली तर ती किती फायद्याची राहिल ते पटवून देण्यात आले.

मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड, पनवेल आणि मावळ हे तीनही तालुके पूर्णतः सद्या भाजपच्या मागे उभे आहेत. २१ लाख मतदारांत शहरी मतदार मोठ्या संख्येने असल्याने त्याचा फायदा भाजजपलाच होणार, असाही युक्तीवाद करणण्यात आला. आजवर तीन निवडणुकांतून शिवसेनेसाठी प्रचार केला आता भाजपसाठी मते मागण्याची गरज आहे, असेही सांगण्यात आले.