मावळ लोकसभा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व घडवून दाखवेन – संजोग वाघेरे

0
245
  • आकुर्डीत कोकण विकास महासंघाच्या मेळावा उत्साहात
  • कोकणवासीयांना स्वाभिमानाची निशाणी “मशाल” पेटविण्याचे आवाहन

पिंपरी- माझ्या समाज कार्याची आणि कामाची पावती संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरच देईल. गेली चाळीस वर्षे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करीत आहे. जनतेच्या हिताचा विचार न करणारे सरकार उलथवून देशात परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे. त्यासाठी सजग मतदार म्हणून‌‌ मला आशीर्वाद द्या. संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात विकासाचे एक नवे पर्व घडवून दाखवेन, असा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील दिला.

आकुर्डी येथील खंडोबा मंदिर येथील सांस्कृतिक सभागृहात कोकण विकास महासंघाच्या वतीने रविवारी, (दि. ५ मे) आयोजित मेळाव्यात संजोग वाघेरे पाटील उपस्थित मतदारांशी संवाद साधताना बोलत होते. याज्ञवेळी कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष तथा काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक सदगुरु कदम, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, निर्मला कदम, सुशीला पवार, सुनिता चव्हाण, वैजयंती कदम, सुभाष पवार, राजेश दळवी, अशोक कदम, राम उतेकर, रुपेश मोरे, सागर शिंदे, संदीप शिंदे, प्रदीप सपकाळ, विजय निकम, विलास बर्वे, संतोष माने, दिलीप दातीर, अनिल मोरे, हनुमंत सपकाळ, आनंद साळवी, मिलिंद दाभोलकर, गणेश चौगुले, राजेंद्र कदम, किशोर जोशी यांच्यासह कोकण विकास महासंघाचे पदाधिकारी, सदस्य व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

पिंपरी, चिंचवड, पनवेल, उरण आणि कर्जत मधील कोकण विकास महासंघाने मावळ लोकसभा मतदारसंघात कार्यरत असणाऱ्या कोकण विकास महासंघाने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे (शरद पवार) गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे या दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठींबा दिला आहे.

डॉ. कैलास कदम म्हणाले, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. भाजप सरकारने जी खोटी आश्वासने दिली. त्याच्या विरोधात उत्तर देण्यासाठी या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून कोकण विकास महासंघाने नागरिकांना अधिकाधिक प्रमाणामध्ये संपर्क साधावा. तसेच ग्रासलेल्या महागाई, बेरोजगारी विरोधात मतदार पेटून उठलेला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मशाल हे चिन्ह लक्षात ठेवा. उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मावळ लोकसभा मतदारसंघातील सूज्ञ मतदार प्रचंड बहुमताने विजयी करणार, असा विश्वास डॉ. कदम यांनी या वेळी व्यक्त केला.

दरम्यान, कोकण विकास महासंघाच्या वतीने कोकणवासियांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. त्याचा मनमुराद आनंद उपस्थितांनी घेतला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकण भागातून पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेले विविध क्षेत्रातील नागरिक बंधू-भगिनींनी या मेळाव्यात राहून संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा दिला