मावळ लोकसभा निकाल दुपारी दीड वाजेपर्यंत

0
176

मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला पार पडणार आहे. मावळमधील पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड व पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतमोजणीसाठी एकूण १०८ टेबलवर १४४ फे-यातून मतमोजणी करण्यात येणार आहे. सर्वाधिक २५ फेऱ्या मावळ, पिंपरीच्या तर सगळ्या कमी २३ फे-या चिंचवड व पनवेल विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीसाठी होणार आहेत. साधारणपणे दुपारी दीड वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे संजोग वाघेरे यांच्यातील दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मावळ मतदारसंघात एकूण ५४.८७ टक्के मतदान झाले. यामध्ये उरणमध्ये सर्वाधिक तर पनवेल विधानसभेत सर्वात कमी मतदान झाले. या मतदारसंघात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून यामध्ये १३ लाख ४९ हजार १८४ पुरुष मतदार, १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदार आणि १७३ तृतीयपंथी मतदार आहेत. त्यापैकी १४ लाख १८ हजार ४३९ जणांनी मतदान केले. त्यामध्ये ७ लाख ७७ हजार ७४२ पुरुष तर ६ लाख ४० हजार ६५१ महिला आणि इतर ४६ जणांनी मतदान केले आहे.

मावळ लोकसभेच्या ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. मतमोजणीला १०८ टेबल लागणार आहेत. सर्वाधिक २५ फेऱ्या मावळ, पिंपरी विधानसभेला तर सर्वात कमी २३ फेऱ्या चिंचवड व पनवेल विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीला लागणार आहेत. मावळमध्ये महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा गट) उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात लढत झाली. १३ मे रोजी मतदान झाल्यापासून कोण जिंकणार? यावरून कार्यकर्त्यांचा खलबते सुरू आहेत. यंदा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हॅट्‍ट्रिक साधणार का? तर कोरी पाटी असलेले संजोग वाघेरे विजय मिळवणार? यावर कार्यकर्त्यांची चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु, आम्हीच जिंकणार, असे दावे दोन्ही उमेदवार करत आहेत.

मावळ लोकसभेच्या मतमोजणीला निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. मावळमधील पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड व पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतमोजणीसाठी एकूण १०८ टेबल लागणार आहेत. मात्र टपाली मतमोजणीसाठी चार आणि शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या अर्थात ईटीपीबीएस मतमोजणीसाठी एक असे पाच टेबल असतील. दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

विधानसभा मतदारसंघ क्षेत्रानुसार टेबल आणि मतमोजणी फेऱ्या

मावळ १६ २५
चिंचवड २४ २३
पिंपरी १६ २५
पनवेल २४ २३
कर्जत १४ २४
उरण १४ २४

विधानसभा क्षेत्रानुसार मतदान यंत्र

विधानसभा क्षेत्र यंत्र (बॅलेट युनिट)
पनवेल १,६३२
कर्जत १,०१७
उरण १,०३२
मावळ १,१७०
चिंचवड १,६४७
पिंपरी १,२००
एकूण ७६९८