मावळ मधून श्रीरंग बारणे यांना संधी-शिंदे गटाच्या आठ उमेदवारांची नावे जाहीर

0
586

महायुतीमधील जागावाटप जवळपास फायनल झाल्याने शिंदे शिवसेनेच्या उमेदवार यादीला आज गुरुवारी अखेर मुहूर्त लागला आहे. शिंदे गटाच्या आठ जणांची नावे जाहीर करण्यात आली. महायुतीमधील भाजपने महाराष्ट्रातील 24 लोकसभा मतदारसंघांत उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता शिवसेनेही 8 जागावंर उमेदवारी जाहीर केली आहे. मावळ मधून श्रीरंग बारणे यांनी सलग तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मंत्री उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, खासदार सुनील तटकरे यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची बुधवारी रात्री राज्यस्तरीय जागावाटपासंदर्भात चर्चा केली. या वेळी भाजपने जाहीर केलेल्या 24 जागांच्या व्यतिरिक्त उर्वरित 24 जागांवर चर्चा झाली. या चर्चेत जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गुरुवारी शिवसेना पक्षाकडून 8 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले. रायगड, नाशिक, यवतमाळ वाशीम, ठाणे, बारामती या जागांचा तिढा सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हे आहेत उमेदवार

रामटेक – राजू पारवे

बुलडाणा – प्रतापराव जाधव

मावळ – श्रीरंग बारणे

शिर्डी – सदाशिव लोखंडे

हिंगोली – हेमंत पाटील

दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे

कोल्हापूर – संजय मंडलिक

हातकणंगले – धैर्यशील माने