मावळ घटनेतील नराधमाला फाशी द्या – कविता आल्हाट

0
261

पिंपरी दि. ११ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना धक्कादायक आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा नराधमांना फाशीच व्हायला हवी अशा शब्दात महिलांवरील अत्याचारांविरोधात राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी संताप व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली मावळ येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी (दि.10) आंदोलन करण्यात आले . यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त शिंदे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे , कार्याध्यक्ष कविता खराडे ,अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रेय जगताप , प्रकाश सोमोवंशी, अमर फुगे, राजू खंडागळे ,सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गंगा धेंडे , सुप्रिया सोलंकुरे ,सुनीता अडसुळे , ज्योती तापकीर , संगीता कोकने , पल्लवी पांढरे , अर्बन सेल अध्यक्ष मनिषा गटकळ , काशिनाथ जगताप, समीता गोरे ,मेघा पवार आदी उपस्थित होते.

यावेळी कविता आल्हाट म्हणाल्या, पवन मावळातील कोथूर्णे गावामध्ये सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली. अशा प्रकारची ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी आमची आहे. अशा घटना घडू नये म्हणून शहरांमध्ये महिलांना योग्य प्रकारची सुरक्षा द्यावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे देखील केली आहे असे आल्हाट यांनी सांगितले.

सत्तेत बसलेले निष्क्रिय
मावळातील कोथूर्णे गावामध्ये 2 ऑगस्ट रोजी सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाले.त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे.आरोपीने त्याचा कबुली जबाब दिल्यानंतरही अद्यापही खटला उभा राहिलेला नाही. याला कारण सत्तेत बसलेले निष्क्रिय सत्ताधारी आहेत. जिल्ह्याला पालकमंत्री नाही. गृहमंत्री पद रिक्त आहे.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न निर्माण झाला आहे . अशा शब्दात कविता आल्हाट यांनी भाजप सरकारला खडे बोल सुनावले आहेत.