मावळात बापू भेगडेंसाठी सांगली पॅटर्न, सुनील शेळकेंच्या विरोधात शरद पवारांचा उमेदवार नसेल

0
92

मावळ, दि. 25 (पीसीबी) : अजित पवारांचे उमेदवार सुनील शेळकेंना घेरण्यासाठी मावळमध्ये सांगली पॅटर्न राबवला जाणार आहे. त्यासाठी शरद पवार इथं उमेदवार देणार नसून, बंडखोर बापू भेगडेंना मविआचा पाठिंबा जाहीर करणार आहेत, अशी विश्वासू सूत्रांनी एबापी माझाला माहिती दिली आहे. बापू भेगडेंना मावळ भाजपने आधीचं पाठिंबा जाहीर केला आहे, अशातच आता सुनील शेळकेंच्या पराभवासाठी शरद पवार सुद्धा हा नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत.

मविआच्या जागावाटपात मावळ शरद पवार गटाच्या वाट्याला येणार आहे. म्हणूनचं बंडखोर बापू भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केलेली आहे. पवारांकडून सुद्धा या मागणीला संमती मिळणार असं जवळपास निश्चित मानलं जातं आहे. म्हणूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेते भेगडेंच्या प्रचारात सक्रिय होताना दिसू लागले आहेत. सोबतच काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना ही भेगडेंना पाठिंबा देत शेळकेंना कोंडीत पकडणार असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळं अजित पवार गटाच्या सुनील शेळके विरोधात अवलंबला जाणारा हा मावळ पॅटर्न अतीतटीचा होणार, हे उघड आहे.

मावळच्या जनतेच्या आशिर्वादावर बापू भेगडे यांना निवडूण आणणार असल्याचे बाळा भेगडे म्हणाले. योग्य वेळी योग्य प्रयोग करायचा असतो असे बाळा भेगडे म्हणाले. त्यामुळं मी यावेळी उभा राहणार नाही. आम्ही बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप टिकला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. पाच वर्ष आम्ही खूप भोगलं आहे असे बाळा भेगडे म्हणाले. आज आमचं लक्ष बापू भेगडे यांना निवडून आणणे हेच आमचे लक्ष असल्याचे बाळा भेगडे म्हणाले.

उमेदवारीऐवजी दिलं महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचं उपाध्यक्षपद
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची पक्षाकडून राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र या पदाची मागणी केली नाही त्यामुळे हे पद नको. तर मावळ विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी मागितली असून पक्षाने माझी उमेदवारी जाहीर करावी अशी भूमिका बापू भेगडे यांनी घेतली होती. मात्र, अजित पवार गटाकडून सुनिल शेळके यांनाचं पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे पक्षात बंडखोरीचे चित्र निर्माण झाले आहे, अशातच आता अजित पवारांना धक्का देण्यासाठी मावळमध्ये शरद पवार उमेदवार देणार नाहीत तर बंडखोरी करणाऱ्या भेगडेंना पाठिंबा देण्याबाबतच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.