मावळ, दि . १४ ( पीसीबी ) – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. ग्रुप ग्रामपंचायत आहिरवडे येथील जोड रस्त्यांसाठी पाठपुरावा करून ५० लाखांचा निधी मंजूर करून आणला. त्यातून राष्ट्रीय राजमार्ग ४ ते आहिरवडे जोडरस्त्याच्या सुधारणा कामांचे भूमिपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय नवघने, शिवसेना देहूगाव शहर प्रमुख सुनिल हगवणे, सरपंच सविता काजळे व उपसरपंच स्वाती पाराटे उपस्थित होते. तसेच नवनाथ हरपुडे, संभाजी शिंदे, भाऊ बराटे, दिपक चव्हाण, सचिन चव्हाण, सतीश इंगवले, मदन शेडगे व ग्रामस्थ उपस्थित होते. खासदार बारणे यांनी सर्वाधिक निधी डोंगरभाग, आदिवासी पाडे असलेल्या मावळ तालुक्याला दिला आहे. जिल्हा नियोजन समिती, खासदार निधी मावळच्या विकासाठी दिला आहे. राजमार्ग ४ ते आहिरवडे जोड रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या दळणवळणात मोठी सोय होणार असून, स्थानिक विकासाला गती मिळणार आहे. ग्रामस्थांनी खासदारांच्या या प्रयत्नाचे कौतुक करत आभार मानले. उपस्थित मान्यवरांनी या कामाचे लवकरात लवकर पूर्णत्वासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

खासदार बारणे म्हणाले की, मावळ तालुका मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. कमी लोकवस्ती असलेली गावे आहेत. या गावांमधील अंतर्गत रस्ते पक्के नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. गावातील रस्ते विकास करण्यावर भर दिला. वाड्या, वस्त्यांपर्यंत रस्ते करण्यास प्राधान्य दिले आहे. सर्वाधिक निधी मावळसाठी दिला आहे. दीनदयाळ योजनेअंतर्गत दुर्गम भागातील गावांमध्ये वीज पोहोचविली आहे. राजमार्ग ४ ते आहिरवडे या जोड रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची स्थानिकांनी मागणी केली होती. त्यानुसार या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. काम वेगात आणि दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. या जोड रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची मोठी सोय होणार आहे.
















































