मावळमधून संजोग वाघेरेंना खासदार म्हणून दिल्लीत पाठवू – डॉ. कैलास कदम

0
166
  • देशात सरकारकडून सुरू असलेल्या हुकुमशाही व एकाधिकारशाही विरुध्द काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वाखाली इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढा देण्याचे काम सुरू आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य मतदाराने देशात परिवर्तनाचा निश्चय केलेला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात देखील संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करून इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचा खासदार दिल्लीत पाठवू, असे आवाहन काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ शहर कॉंग्रेस पदाधिकाररी व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक पिंपरीतील खराळवाडीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यासह काँग्रेसचे माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक बाबू नायर, अशोक मोरे, शामलाताई सोनावणे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्हेकर, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, प्रा. किरण खाजेकर, सोमनाथ शेळके, अमर नाणेकर, सज्जी वर्की, भाऊसाहेब मुगुटमल, अबूबकर लांडगे, सचिन कोंढरे, बाबा बनसोडे, विशाल सरवदे, विजय ओव्हाळ, प्रा. बी. बी. शिंदे, ॲड. अशोक धायगुडे, अनुप शर्मा, अक्षय शहरकर, झेवियर ॲन्थोनी, शहाबुद्दीन शेख, गौतम ओव्हाळ, मेहबूब शेख तारिक रिजवी, मयूर जयस्वाल ॲड. अनिरुद्ध कांबळे, गौरव चौधरी, सचिन नेटके चंद्रशेखर जाधव, वाहब शेख, महेश पाटील, राहुल शिंपले, दिपक श्रीवास्तव, पांडुरंग जगताप, आण्णा कसबे, सतिश भोसले, वीरेंद्र गायकवाड, विशाल कसबे, दाहर मुजावर, सौरभ शिंदे, आकाश शिंदे, उमेश बनसोडे, मोहन अडसूळ, मिलिंद फडतरे, सागर औसर, जितेंद्र छाबडा, भारती घाग, सुनिता जाधव, सुवर्णा कदम, प्रियंका कदम, अर्चना राऊत, सीमा यादव, ॲड. अनिकेत रसाळ, सुधाकर कुंभार, आनंद फडतरे, चंद्रशेखर हौन्शाळ, कुंदन कसबे वसंत वावरे, रवि कांबळे, सुरज गायकवाड, बसवराज शेट्टी, प्रवीण कांबळे, तसेच शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. कैलास कदम यांनी देशात इंडिया आघाडीच्या माध्यमातून व राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपले नेते भाजप विरोधात लढत आहे. त्यांना बळ देण्याची व प्रत्येक जागेवर आपल्या आघाडीचा उमेदवार विजयी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे नमूद केले. तसेच, बैठकीत मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या विविध जबाबदा-यांचे वाटप यावेळी करण्यात आले.

कष्टकरी, सामान्य माणसाची ही लढाई आपणच जिंकणार: संजोग वाघेरे पाटील

पिंपरी चिंचवड शहरात विविध पदांवर व राजकीय जबाबदा-या पार असताना काँग्रेस पक्षासोबत काम केले आहे. मागच्या काळात महागाई, बेरोजगारी, कामगारांच्या प्रश्नावर, तसेच शहरातील विविध मुद्द्यांवर काँग्रेससोबत रस्त्यावर उतरून आपण आंदोलने केली. आपली सर्वांची लढाई देश हिताची, तसेच कष्टकरी, कामगार, सामान्य माणसाच्या न्यायासाठी आहे. सर्व मिळून लढणा आणि आपणच जिंकणार आहोत, असा विश्वास यावेळी उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला.