मावळचे प्रथम संसदरत्न खासदार स्व. मा. गजानन बाबर यांना द्वितीय पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली अर्पण

0
280

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – मावळचे प्रथम संसदरत्न खासदार स्व. मा. गजानन बाबर यांना त्यांचे द्वितीय पुण्यतिथी निमित्त श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली अर्पण करताना बँकेचे अध्यक्ष श्री योगेश बाबर यांनी भाऊंच्या आठवणींना उजाळा देताना भाऊ ज्या तत्वशीलतेने राजकारण तसेच समाजकारणात वावरले तोच आम्हा बाबर परिवरचा मार्ग असेल असे संगितले. यावेळी बँकेच्या माजी अध्यक्षा श्रीमती अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक श्री कुमार जाधव, संचालक श्री भास्कर बोरूडे व श्री मोहन बाबर यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्री.दिलीप देशमुख, संचालक श्री.दिलीप सावंत, श्री.अशोक काळभोर, श्री.अमित बाबर, श्री.धीरज बाबर, श्री.अमोल निकम, श्री.कृष्णा वाळके, ॲड भाऊसाहेब शिंदे व बँकेचे सरव्यवस्थापक श्री संजय जोशी यांचेसह बाबर परिवारातील माजी नगरसेवक श्री प्रकाश बाबर, श्रीमती माधुरी बाबर, श्री सुरज बाबर, डॉ मनीषा जाधव, श्री सागर धुमाळ, सौ प्रिती धुमाळ व श्री.विजय पवार उपस्थित होते. यावेळी श्री भगवान गवारे, श्री शंकर वाडकर, श्री सुरेश वाडकर, श्री महेश खराडे, श्री ऋषीकेश वाघेरे, श्री सुरेश मोहिते, श्री दिनेश लिंगवत, श्री लक्ष्मण शिंदे, श्री राजाभाऊ म्हस्के, श्री सत्यजीत बाबर, श्री मधुकर बाबर, श्री समीर धुमाळ आदि उपस्थित होते.