मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व सातही आरोपिंची निर्दोष मुक्तता कऱण्यात आल्याचा महत्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे. कोणताही सबळ पुरावा नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे, भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष ठरले आहेत. दरम्यान, या निकालाने हिंदुत्ववादी संघटना सुखावल्या आहेत.
प्रकरणाची सुनावणी सुमारे 17 वर्षांनंतर अखेर पूर्ण झाली आणि अखेर आज निकाल आला, विशेष एनआयए न्यायालयाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल सुरक्षित ठेवला होता. या प्रकरणाचा आज (31 जुलै 2025) निकाल जाहीर करण्यात आला. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटरसायकलवर ठेवलेल्या वाहनांवर ठेवलेल्या स्फोटक उपकरणांमध्ये स्फोट झाल्याने सहा लोक ठार झाले होते आणि 100 हून अधिक जखमी झाले होते. खटल्यादरम्यान सरकारी वकिलांनी 323 साक्षीदारांची चौकशी केली, त्यापैकी 37 जण आपल्या जबाबावरून फिरले.
या प्रकरणात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत खटला सुरू होता.