मालाची थकबाकी न देता 47 लाखांची फसवणूक

0
70

पिंपरी, १९ जुलै (पीसीबी)
घेतलेल्या मालाची थकबाकी न देता एका कंपनीची 47 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 16 एप्रिल 2024 रोजी चिंचवड येथे घडली.

रोहित सतपाल मित्तल, राहुल सतपाल मित्तल, सतपाल मित्तल, दोन महिला (सर्व रा. निगडी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 51 वर्षीय व्यावसायिकाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची वायर्स आणि केबल फर्म आहे. त्यांच्याकडून आरोपींनी लन केबल हा माल विकत घेतला. त्या मालाची थकबाकी 47 लाख 88 हजार 792 रुपये न देता त्यांनी फिर्यादीची फसवणूक केली. त्यामुळे 16 एप्रिल रोजी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी आरोपींकडे गेले होते. त्यावेळी सतपाल मित्तल याने फिर्यादी यांच्या पत्नीशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच तुम्हाला कोठे जायचे तिकडे जा. थकबाकी मिळणार नाही व देणार पण नाही. मी जर जुना सतपाल बनलो तर पुढे तुम्हाला कठीण जाईल’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.