मालमत्तेच्या वादातून काकाने केली पुतण्याची हत्या

0
32

मुंबई, दि. 09 (पीसीबी) : मालमत्तेच्या वादातून काकाने पुतण्याची हत्या केल्याची घटना वांद्रे येथे शनिवारी रात्री घडली. डोक्यात बांबू मारल्याने कामराज खानचा मृत्यू झाला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी कामराजचा काका हबीबुर रहमान खान आणि काकी सना हबीबुर खान या दोघांना अटक केली आहे.

वांद्रे पश्चिम येथे इम्रान खान आणि त्यांचा भाऊ कामराज हे वास्तव्यास असून त्यांचे गॅलेक्सी चित्रपटगृहाजवळ किराणा मालाचे दुकान आहे. इम्रान दुकान तर कामराज हा रिक्षा चालवण्याचे काम करत होता. कौटुंबिक वादातून त्याची वारंवार भांडण त्यांच्यात वाद व्हायचे. शनिवारी सायंकाळी हबीबुर, सना यांनी इम्रानची बहीण, कामराज आणि भाचा सादीकेन सोबत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या हबीबुर याने दुकानाजवळ पडलेला बांबू घेऊन कामराजच्या डोक्यात मारला. डोक्यात मार लागल्याने कामराज गंभीर जखमी झाला. त्याचवेळी सनानेही सादीकेन याच्या डोक्यात बांबू मारला. जखमी झालेल्या दोघांना भाभा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी कामराजला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच वांद्रे पोलिस रुग्णालयात आणि घटनास्थळी पोहोचले. इम्रानने दिलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी हबीबुर आणि सना विरोधात गुन्हा दाखल केला. हबीबुर विरोधात एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. हबीबुर आणि त्यांची पत्नी सना या दोघांनाही अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.