मालदार नेत्यांमध्ये यशोमती ठाकूरांचे नाव

0
48

– 48 एकर 22 कोटीची जमीन, 87 लाखांचे दागिने

अमरावती, दि. 25 (पीसीबी) : राज्यात सध्या विधानसभेचारणसंग्राम सुरु असून प्रत्येक पक्षाकडून त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवले जात आहेत. नुकतीच काँग्रेसने त्यांची पहिली यादी जाहीर केली असून एकूण 48 उमेदवारांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश असून बरेच विद्यमान आमदार पु्न्हा एकदा मैदानात उतरले आहेत. दरम्यान काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये केवळ तीनच महिलांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस यशोमती ठाकूर यांना परत एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे.

दरम्यान, नुकतेच यशोमती ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तिवसामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विणेश फोगाट उपस्थित त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी यशोमती ठाकूर यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीवर दर्शन घेतले आणि नंतर बाईक रॅली तिवसामध्ये दाखल झाली. यावेळी तिवसामध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आणि त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी आपला नामांकन अर्ज भरलाय. अशातच उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. त्यानुसार यशोमती ठाकूर यांच्याकडे जवळपास 22 कोटी 9 लाख रुपयांची शेतजमीन , 87 लाखांचे दागिने आणि मौल्यवान वस्तूसह कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती पुढे आली आहे.

यशोमती ठाकूर यांची संपत्ती नेमकी किती?
रोख रक्कम आणि बँकेतील ठेवी
वर्ष – 2019
4 लाख 82 हजार 666 रुपये.

वर्ष – 2024
50 लाख 51 हजार 13 रुपये.

चार चाकी वाहन
वर्ष – 2019
मारुती सिआझ – किंमत अंदाजे 13 लाख 50 हजार रुपये.

वर्ष – 2024
मारुती सिआझ – किंमत अंदाजे 7 लाख रुपये.

दागिने आणि मौल्यवान वस्तू
वर्ष – 2019
सोने – 400 ग्राम, किंमत – 15 लाख रुपये.

वर्ष – 2024
सोने – 400 ग्राम, किंमत – 30 लाख रुपये.

एकूण मूल्य – वर्ष – 2019 –
33 लाख 32 हजार 645 रुपये 50 पैसे..

वर्ष – 2024
87 लाख 51 हजार 13 रुपये.

कुटुंबाकडची एकूण शेतजमीन
वर्ष – 2019 – (नाशिक आणि अमरावती जिल्हा)
22 एकर, अंदाजे किंमत – 5 कोटी 95 लाख रुपये..

वर्ष – 2024 (नाशिक आणि अमरावती जिल्हा)
48 एकर अंदाजे किंमत – 22 कोटी 9 लाख 21 हजार 110 रुपये..

अमरावती आणि तिवसा येथील घर
वर्ष – 2019
एकूण किमंत अंदाजे – 2 कोटी 80 लाख रुपये.

वर्ष – 2024 – 3 कोटी 14 लाख 452 रुपये.( हिस्याचे मूल्य )

एकूण स्थावर मालमत्ता किंमत ( शेत जमीन + घर )

वर्ष – 2019 – 8 कोटी 75 लाख रुपये
वर्ष – 2024 – 9 कोटी 1 लाख 92 हजार 326 रुपये..

बँकेचे कर्ज –

वर्ष – 2019 – 8 लाख 50 हजार 560 रुपये.
वर्ष – 2024 – 4 लाख रुपये.