मारुती जाधव युथ फाऊंडेशनच्या वतीने गॅस ग्राहक रांगेमधील सर्व नागरिकांना पाण्याच्या बॉटल देऊन समाजसेवेचाआदर्श

0
2

अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस (LPG) टंचाईबाबत बातम्या सध्या मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी प्रत्येक भागामध्ये लांब रांगा आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील कृष्णा नगर फुलेनगर भागामध्ये उन्हामध्ये लांब रांगा असताना कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशनच्या वतीने रांगेमधील सर्व नागरिकांना पाण्याच्या बॉटल देऊन एक आदर्श निर्माण करून दिला. नेहमीच अग्रगण्य असणार कीर्ती मारुती जाधव फाउंडेशन वेगवेगळ्या उपक्रमातून नावलौकिक करून सामाजिक आदर्श निर्माण करत असतो. फाउंडेशनच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मारुती जाधव, दत्ता धर्मे, अभी जाधव, कृष्णा जाधव, यश अवसरमल, गणेश देवगिरे, धनंजय जाधव तसेच सर्व मित्र परिवार उपस्थित होता